सेमिनरी हिल्स येथे गायीच्या गोठ्यात सापाच्या फुस्कारण्याचा आवाज तेथील रहिवाशांना ऐकू आला. दरम्यान तेथील रहिवासांनी सर्पमित्र शुभम जीआर यांना याची माहिती मिळतात शुभम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुरक्षित रित्या या जहाल विषारी सापाला रेस्कयू केले आणि निसर्गाच्या अधिवासात सोडले. शुभम यांनी दिलेल्या माहितीनुसार या सापाच्या चावल्याने 40 ते 45 मिनिटात पीडित व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो.