खुलताबाद: फुलंब्री-खुलताबाद महामार्गावरील सराई गावाजवळ शिवसेना उबाठाचे रस्ता रोको आंदोलन; वाहतूक कोलमडली
खुलताबाद तालुक्यातील सराई गावाजवळील फुलंब्री-खुलताबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले असून वाहनचालक व नागरिकांत संताप निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आज दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने तालुका प्रमुख राजू वरकड यांच्या नेतृत्वाखाली भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.