चिखलदरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख अब्दुल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने नगरसेवक पदावरही वर्चस्व सिद्ध करत १३ जागांवर विजय संपादन केला असून नगरपालिकेत काँग्रेसची स्पष्ट बहुमताची सत्ता स्थापन झाली आहे.विजयाची अधिकृत घोषणा होताच शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला.नवनियुक्त नगराध्यक्ष शेख अब्दुल यांनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेला दिले.चिखलदरा येथील दर्ग्यावर दुपारी ४:३० वाजता चादर चढवून आशीर्वाद घेतले.