अकोट: शिरसोली येथे मराठा शौर्य दिन पार पडला शहिदांना मानवंदना
Akot, Akola | Nov 29, 2025 अकोट जवळील शिरसोली येथे इंग्रज मराठा युद्धातील शहिदांना मराठा शौर्य दिन साजरा करून मानवंदना देण्यात आली 29 नोव्हेंबर 1803 साली अकोट जवळील शिरसोली येथे इंग्रज मराठ्यांचे युद्ध झाले होते या घनघोर युद्धामध्ये मराठ्यांचे सरदार कर्ताजीराव जायले हे शहीद झाले होते तर यावेळी इंग्रज सैन्य अधिकारांचा खात्मा करत हे युद्ध मराठ्यांनी जिंकले होते या दैदिप्यमान इतिहासासाठी मराठा शौर्य दिन साजरा करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली