उदगीर: उदगीरात मोठ्या उत्साहात आतषबाजीने दीपावली साजरी
Udgir, Latur | Oct 21, 2025 उदगीर शहरात २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,लक्ष्मीपूजन निमित्ताने उदगीर शहरातील अनेक दुकाने फुलांच्या माळेने सजविण्यात आले होते, केळीची पाने,झेंडूची फुले यांचे तोरण बांधून अनेक छोटे मोठे व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन करून दीपावली साजरी केली, दीपावली निमित्ताने उदगीर शहरात आकाशातून मुसळधार पाऊस पडावा तशी आकाशात फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी पहायला मिळाली, जागोजागी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याचे दृश्य दिसून आले.