पनवेल: पनवेल महानगरपालिका हवा प्रदूषण नियंत्रण मोहिमेत आक्रमक; १६९ बांधकामांना नोटीस
Panvel, Raigad | Dec 2, 2025 वाढत्या हवा प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये तपासणी, कारवाई आणि यंत्रणांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. न्यायालयीन निर्देश व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने पालिकेने प्रदूषण नियंत्रणाचे उपक्रम अधिक गतीमान केले आहेत. महापालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना एकूण १६९ नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक प्रभागात स्थापन करण्यात आलेल्या समित्या नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकामांवर थेट कारवाई करत असून त्यांचा अहवाल आयुक्तांना सादर केला जात आहे.