दारव्हा: बकऱ्या चोरणारी टोळी दारव्हा पोलिसांच्या जाळ्यात, खाटीकपुरा परिसरात पोलिसांची कारवाई
दारव्हा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बकऱ्या चोरीच्या मालिकेला दारव्हा पोलिसांनी अखेर आळा घातला आहे. मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) दुपारी सुमारास खाटीकपुरा भागात कारमधून बकरी चोरी करून नेत असलेल्या दोन आरोपींना नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी कारसह रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी बारा वाजता खाटीकपुरा परिसरात एक संशयास्पद स्कोडा कार (क्र. एमएच ०२ पीए ५६७८) फिरताना दिसली. कारमध्ये बकरी.....