यवतमाळ: स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ; सहाय्यक आयुक्त मंगला मुन
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वर्ग ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून लाभ घेता येणार आहे.