घटस्फोट झालेल्या पत्नीस न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगी रक्कम न भरल्याने पतीस एक महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्णय मंगरुळपीर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला. प्राप्त माहितीनुसार मोतीराम कुंडलीक काटेकर (वय 55) रा. मालेगाव जि. वाशिम यांच्याविरुध्द त्यांच्या पत्नी वंदना मोतीराम काटेकर (वय 50) रा. शहापुर खुर्द ता. मंगरुळपीर यांनी कलम 147 बी.एन.एस. अंतर्गत पोटगी व नुकसान भरपाई संदर्भात प्रकरण दाखल केले होते.