जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता शालगर यांच्यात आढावा बैठकीदरम्यान शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवार दि. 4 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेचे पारदर्शक कामकाज करण्याच्या कारणावरुन सीईओ आणि कर्मचारी यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध कर्मचारी संघटनांनी यापूर्वीही आंदोलन केले होते.