श्रीरामपूर: श्रीरामपूर काँग्रेसला मोठा धक्का माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला असून यामध्ये माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह अनेकांनी भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे यामुळे शहरात भाजपाची ताकद निश्चित वाढणार आहे यामध्ये शिवसेना नेते माजी आ भानुदास मुरकुटे यांच्या भगिनी मेहुणे व भाचे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे