तुळजापूर: तुळजापूर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे गंठण लंपास, पोलिस ठाणे तुळजापूर येथे गुन्हा दाखल.
तुळजापूर बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलेने संगिता महावीर कंदले (वय 45, रा. व्होर्टी, ता. तुळजापूर) यांचे गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे, सुमारे 40 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरले. घटनेची फिर्याद 11 सप्टेंबर रोजी दाखल झाली असून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.