नरखेड: काटोल नरखेड भागातील पिकांचे पावसामुळे झाले नुकसान, आमदार चरण सिंग ठाकूर यांनी केली संत्रा मोसंबी बागांची पाहणी
Narkhed, Nagpur | Sep 25, 2025 गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या सततच्या आणि अवकाळी पावसामुळे काटोल तसेच नरखेड परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः संत्रा व मोसंबी या महत्त्वाच्या फळ पिकांवर पावसाचा गंभीर परिणाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बाधित भागांची आमदार चरणसिंग ठाकूर यांनी पाहणी करून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि अडचणी जाणून घेतल्या.