दि. 14 डिसेंबर रोजी इस्लापूर परिसरातील रोड नाईक तांडा भागात बिबट्या फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली होती व त्याचे ठसे देखील जमिनीवर दिसून आले होते, या अनुषंगाने वन विभागाने ठसेची माहिती घेत अहवाल पाठवला होता मात्र त्या अहवालात ते बिबटया नसून तडस हा वन्य प्राणी असल्याचे वन विभागाच्या वतीने आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास स्पस्ट केले असून नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये असे देखील आवाहन यावेळी केले आहेत.