शेतातील गवत कापत असताना शेजाऱ्यांनी इथे गवत कापायचे नाही नाहीतर तुम्हाला जीवे मारून टाकू असे म्हणत लाकडी दांड्याने मारहाण केली या घटनेत पूजा विजयसिंह राजपूत वय ३० वर्षे राहणार आघुर या जखमी झाल्या.या प्रकरणात चौघा विरुद्ध वैजापूर पोलिसांत सोमवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पूजा विजयसिंह राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय पोपटसिंग राजपूत,आकाश विजयसिंह राजपूत व दोन महिला सर्व राहणार आघुर तालुका वैजापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे.