मेहकर: वंचितांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलविणारा मेहकरचा अनोखा उपक्रम डॉ. आंबेडकर वाचनालय येथे कार्यक्रम संपन्न
“आपली दिवाळी फटाक्यांनी उजळते, पण कोणाचीतरी दिवाळी अंधारातच राहते”— या संवेदनशील भावनेतून मेहकर शहरात गेली 15 वर्षे अखंडपणे सुरू असलेला “वंचितांची दिवाळी” हा उपक्रम यंदाही भावनिक वातावरणात पार पडला.भटकंती करून आपला संसाराचा गाडा हाकणाऱ्या, गरीब कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय आणि लोक कलावंत फाउंडेशन, मेहकर यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.