नेर: तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेताला आले तलावाचे स्वरूप, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
Ner, Yavatmal | Sep 28, 2025 नेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पुराची अवस्था निर्माण झाली आहे. तालुक्यातील शहापूर टाकळी शेंद्री येथे शेती पुराच्या पाण्यामुळे शेतीच्या अतोनात नुकसान झाले आहे.पुराच्या पाण्यामुळे शेत आहे की तलाव आहे अशी अवस्था शेताची झालेली आहे.यावेळी सरपंच शितल राठोड पोलीस पाटील रमेश पवार,शिवाजी शिंदे व सामाजिक कार्यकर्ते सुगंध राठोड यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी केली.