अक्कलकुवा: अक्कलकुवा तालुक्यात भाजपा व काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांचा आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावीत यांचे कट्टर समर्थक यशवंत नाईक व बबिता नाईक तसेच देव मोगरा पुर्नवर्सन येथील गंभीर वसावे यांनी आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पुर्नवर्सन येथे आयोजित शिवसेनेच्या प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.