गोंदिया: गोरेगाव येथील लाचेची मागणी करणारा तलाठी अरविंद डहाट एसीबीच्या जाळ्यात
तहसील कार्यालय अंतर्गत साजा क्रमांक सात गोरेगाव येथील तलाठी अरविंदकुमार डहाट वय 43 वर्षे यांनी तक्रारदाराकडून 15 हजार रु.लाचेची मागणी केल्याप्रकरणी तपास सापळ्यात तलाठी डहाट यांनी 14 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाच्या पथकाने 4 नोव्हेंबर 2025 ला कारवाई करीत डहाट यांना ताब्यात घेतले आहे. 27 आक्टो.ला तक्रारदाराने तक्रार दिली की गट क्रमांक 1004/4मध्ये असलेल्या पडीत जमिनीपैकी 305.50 चौरस मीटर जागा अकृषक विकासात्मक परवानगी मिळण्याकरता लाचेची मागणी केली होती