खुलताबाद: शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची मागणी,तहसीलदारांना निवेदन,
खुलताबाद तालुक्यात खाजगी व्यापाऱ्यांकडून मक्याची खरेदी फक्त ₹1000–₹1200 दराने होत असून शासनाने जाहीर केलेला ₹2400 दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले. महिला तालुकाध्यक्षा अंजु नागे यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या निवेदनात तातडीने शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे