उत्तर सोलापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवन येथे ही बैठक संपन्न झाली.