मुर्तीजापूर: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे शेतकरी संघटनेचे एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून एनडीआरएफ चे निकष बाजूला सारून अति पावसाने,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत तात्काळ जाहीर करावी सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करून सातबारा कोरा करावा अशा विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेने सोमवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता एक दिवशीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना विविध मागण्यांची पुर्तता करण्याबाबत निवेदन दिले.