समुद्रपूर: राष्ट्रीय महामार्गावरील कांढळी चौकात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
समुद्रपूर: नागपूर,चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांढळी फाट्याजवळ भरधाव व निष्काळजी टँकरने दुचाकीला जबर धडकी दिली या भिषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत्यकाचे नाव रामभाऊ शंकरराव धोटे वय ६०, रा. चाकुर, ता.समुद्रपूर असे आहे. प्राप्त माहितीनुसार, रामभाऊ धोटे हे सिंदी (रेल्वे) येथून किराणा व बँकेच्या कामानिमित्त दुचाकी क्रमांक MH-32 M-2483 ने चाकुरकडे परतत होते.याच दरम्यान अपघात झाला.