सांगोला: बसस्थानक हादरले: भरधाव कार अपघात, वाहक ठार, आरोपी फरार
मुक्कामी एसटी बस घेऊन जाणाऱ्या वाहकास बसस्थानक आवारातच भरधाव कारने ठोकरले. या अपघातात गंभीर वाहकाचा सोमवारी दुपारी १ वाजता सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी झालेल्या आनंदा माळी आनंदा रामचंद्र माळी (वय ५३, रा. गौडवाडी, ता. सांगोला) असे मृत वाहकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, अपघातानंतर चालकाने कारसह घटनास्थळावरून धूम ठोकली होती. याबाबत एसटी चालक आकाश देवगडकर यांनी फिर्याद दिली आहे.