हिंगणघाट: दारोडा टोलनाका परीसरात अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई:३२ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील दारोडा टोलनाका परीसरात जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या आदेशाने पोलीसांनी अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत ३२ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.प्राप्त माहिती माहितीनुसार २० सप्टेंबरचे रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना मिळताच यांनी पोलीसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.