समुद्रपूर: गिरड परीसरातील वाघाला पकडण्याची परवानगी ३१ डिसेंबरपर्यंत : कर्मचारी अधिकारी वाघाच्या मार्गावर
गिरड खुर्सापार परीसरात एक वाघीण तिचे तिनं बच्छडे व एक वाघ अश्या ५ वांघानी शेतीशिरात मुक्त संचार सुरू केल्याने शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे.यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी ३० सप्टेंबरपर्यंत वनविभागाला मिळाली होते उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात ५० च्यावर अधिकारी कर्मचारी या वाघा जेरबंद करण्यासाठी युद्धात पातळीवर पर्यंतन केले शेवटी परवानगी संपली तर वाघ हातात आला नाही पुन्हा प्रयत्न सुरू केले आहे.