समुद्रपूर: गिरडच्या मातीतील कुस्तीत पैलवानांचा दमदार डाव: पारंपरिक आमदंगलात परिसरातील पैलवानांचा उत्साही सहभाग
दिवाळी पाडव्याच्या शुभदिनी गिरड येथील श्रीराम मंदिर देवस्थान अंतर्गत हनुमान व्यायाम शाळेच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्ती आमदंगलाचे आयोजन करण्यात आले. गिरडसह आसपासच्या गावांतील नामांकित पैलवानांनी रंगलेल्या या आमदंगलात दमदार झुंजींनी मैदान गाजवले, तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात जयघोष करत उत्सवाचा माहोल निर्माण केला.पोलीस स्टेशन गिरडच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत पैलवानांनी ताकद, डावपेच आणि कौशल्याचे अप्रतिम प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली.