तालुक्यातील कोसारा येथे वर्धा नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळूचा उपसा करणारे दोन पोकलेन मशीन जप्त केले. कोसारा येथे वर्धा नदी पात्रात रात्रीच्या भद्रावती तालुक्यातील वाळूमाफिया स्थानिक व्यक्तींच्या सहकार्याने मशीनच्या साहाय्याने वाळू उत्खनन करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर तहसीलदार उत्तम निलावाड हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. या वेळी त्यांना कोसारा शिवारातील वर्धा नदीपात्रात पिवळ्या रंगाचे दोन पोकलेन मशीन अवैध वाळू उत्खनन करताना आढळून आले