सालेकसा तालुक्यातील ग्राम आमगाव खुर्द येथील तीन वर्षीय खुशाल सुखचरण वाघाडे या चिमुकल्याला कुत्र्याने दि.7 डिसेंबर रोजी चावा घेतल्याने त्यास सालेकसा ग्रामीण रुग्णालय येथे औषधोपचार करण्यास नेले असता औषधउपचार दरम्यान प्रकृती जास्त बिघडल्याने दि.22 डिसेंबर रोजी गोंदिया येथील सिटी हॉस्पिटल येथे पुढील औषधउपचार कामी नेले असता तेथील डॉक्टरांनी केटीएस दवाखाना गोंदिया येथे रेफर केल्याने केटीएस दवाखाना गोंदिया येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून दिनांक 23 डिसेंबर रोजी मृत घोषित केले