गेवराई: मालेगाव येथे ऊसाच्या शेतात गांजाची झाडे;पोलिसांनी धाड टाकून ४२ किलो गांजा केला जप्त
Georai, Beed | Oct 28, 2025 शेतात, लावलेल्या गांजाच्या झाडावर धाड टाकून, तब्बल 42 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई गेवराई तालुक्यातील मालेगाव बु शिवरातील गट क्रमांक 248 मध्ये मंगळवार दि 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता चकलंबा पोलिसांकडून करण्यात आली. या कारवाईत सुमारे 12 लाख 55 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून श्रीराम बने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.