बुलढाणा: रन फॉर युनिटीसाठी शरहरातील मुख्य मार्गावर धावले शेकडो पोलीस व नागरिक,
बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी,वॉक फॉर युनिटीचे आयोजन आज 31 ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आले होते.या मॅरेथॉन मध्ये पोलिसांसह शेकडो लोक एकत्र धावले.जिल्हा पोलीस मुख्यालय येथून रन फॉर युनिटी मार्च काढण्यात आला.यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी अंमलदार शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक कर्मचारी सहभागी झाले होते.या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली होती.