लाखनी: विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त! सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
; मुरमाडी तुपकर येथील घटना
मुरमाडी/तुपकर येथे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान पोलिसांनी कारवाई करत शासनाच्या मालकीची रेती (गौण खनिज) विनापरवाना चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. आरोपी भाविकनाथ सुदन मकवाने (वय १९, रा. मुगाव/मेंढा, ता. लाखनी, जि. भंडारा) हा स्वराज ७३५ एफ ई कंपनीचा निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली घेऊन रेती वाहतूक करताना आढळला. पोहवा विजय विठ्ठल राउत यांच्या तक्रारीवरून पालांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.