वाशिम: पंचायत समिती मालेगावला गटविकास अधिकारी द्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांच्या फोटोला घातले साकडे
Washim, Washim | Sep 22, 2025 मालेगाव पंचायत समितीला गेल्या एक महिन्यापासून गटविकास अधिकारी नसल्यामुळ ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे कामे खोळंबली आहेत. वेळोवेळी अर्ज देऊन ही मालेगाव पंचायत समितीला गट विकास अधिकारी न मिळाल्याने दिनांक 22 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना अगरबत्ती कुंकू तांदूळ नारळ अर्पण करून मालेगाव पंचायत समितीला गटविकास अधिकारी द्या अशी मागणी केली.