सावली: विरखल चक येथे घरात शिरले अस्वल वनविभागाने केले जेरबंद
सावली तालुक्यातील विरखल येथे आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास भास्कर लक्ष्मण मारबते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात अस्वल शिरली गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी हे दृश्य पाहिले आणि तात्काळ घराचे दरवाजे बंद करून अस्वलाला घरातच बंद केले या घटनेची माहिती व अधिकाऱ्यांना व व पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर आणि आर आर यु टीम चंद्रपूर यांनी मिळून बचाव कार्य हाती घेतले अखेर आज वनविभागाच्या टीमने सदरचा अस्वलाच सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले