आर्णी: शिवसेनेचा उभाठा ने आर्णीत ‘चटणी-भाकर’ खाऊन केली काळी दिवाळी साजरी
Arni, Yavatmal | Oct 21, 2025 शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाने तात्काळ मदत द्यावी, प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे आर्णी तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘काळी दिवाळी – शिदोरी आंदोलन’ या नावाने चटणी-भाकर खाऊन सरकारविरोधात संतप्त निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या दुःखावर सरकार उदासीन असल्याचा आरोप करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.