भंडारा: भंडारा जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत सकाळी ११.३० पर्यंत १६.२१% मतदान!
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा (नगर विकास विभाग) येथील नगरपालिका प्रशासन शाखेने आज, दिनांक ०२/१२/२०२५ रोजी, भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास सादर केला आहे. सदर वेळेत जिल्ह्यात सरासरी १६.२१% मतदान नोंदवले गेले आहे. या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण १,७०,३१५ मतदारांपैकी २७,६१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात भंडारा नगरपरिषदेत १४.७०% (१२,५८१ मते), तुमसर नगरपरिषदेत १६.२७%