अंजनगाव सुर्जी शहरातील दाट वस्तीच्या व प्रचंड वर्दळीच्या शनिवार पेठ मध्ये रस्त्याच्या कडेला चार फूट खोल गड्डा पडल्याने आज दुपारी २ वाजता तीन नागरिक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे हा गड्डा अनेक दिवसांपासून तसाच उघडा असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.या परिसरातून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत ये-जा सुरू असते.