चंद्रपूर: आसोला मेंढ्या नहरात बुडून आजोबा व नातवाचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाळा येथील रहिवासी असलेले भगवान लाटेलवार सावली तालूक्यातील बोथली येथे मुलगी कार्तिका राजु राजु गोरंतवार गोरंतवार हिच्याकडे दिवाळीनिमित्य आले होते. आज शनिवारी १८ ऑक्टोंबर रोजी भगवान लाटेलवार हे सकाळच्या सुमारास नातू रोहितसोबत बोथली जवळून वाहणाऱ्या आसोलामेंढा येथील नहरात आंघोळीसाठी गेले. आंघोळ करतांना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने नातू रोहित गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी भगवान यांनी पाण्यात उडी घेतली.