कुरखेडा: गेवर्धा येथील ग्रामसभेत महिला भगीनीनी आक्रमक पणे पूढाकार घेत केला गावात दारूबंदीचा ठराव
कूरखेडा तालूक्यातील गेवर्धा येथे आज दि.८ आक्टोबंर बूधवार रोजी दूपारी ३ वाजता सांस्कृतिक सभागृहात दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील दारूबंदी करण्यात यावी असे ठरविण्यात आले तसेच दारूबंदी मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरीता महिलांची दारूबंदी समिती सूद्धा गठीत करण्यात आली. यावेळी समीतीची अध्यक्ष म्हणुन सुशीला सुरेश कांबळे, सचिव सुजाता गोपाल मडावी, उपाध्यक्ष अल्का वासूदेव नैताम तर सहसचिव म्हणून माधूरी नितीन शेंडे यांची निवड करण्यात आली.