लातूर -लातूर महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना संपूर्ण प्रशासन सज्ज मोडमध्ये गेले आहे. निवडणूक प्रक्रिया निर्धोक व पारदर्शक पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या स्ट्रॉंग रूम, मतमोजणी केंद्र तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या जागांची पाहणी मनपा आयुक्त श्रीमती मानसी व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी यांनी बुधवारी केली. असल्याची माहिती मनपाच्या वतीने आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.