शाहिद मिश्रा विद्यालय येथे ४२ वर्षांनंतर आयोजित माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनात सहभागी होण्याचा भावनिक आणि आनंददायी योग आला.शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुने मित्र, शिक्षक व सहपाठी यांच्यासोबत घालवलेले क्षण मनाला स्पर्शन गेले. अशा स्नेहसंमेलनातून नात्यांची उब आणि आठवणींचे बंध अधिक दृढ होतात. असे याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले म्हणाले.