तळा: तळा:तळघर येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे करण्यात आले डांबरीकरण.
Tala, Raigad | Apr 6, 2024 तळा तालुक्यातील मौजे तळघर येथे शनिवार दि.६ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.या कामासाठी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या आमदार निधीतून निधी मंजूर करण्यात आला होता. सदर डांबरीकरण होत असताना रायगड जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव,तळघर सरपंच प्रवीण अंबारले,सदस्य अजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.