चंद्रपूर: आचारसंहिता सुरू असल्याने भाविकांनी नियोजन करूनच महाकाली देवीच्या दर्शनासाठी यावे, व्यवस्थापक, विश्वस्त सुनील महाकाले
चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे.दरम्यान 14 एप्रिलला महाकाली यात्रा सुरू होत आहे. आचारसंहिता सुरू असल्याने भाविकांनी नियोजन करूनच महाकाली देवीच्या दर्शनासाठी यावे, सर्व भाविकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक, विश्वस्त सुनील महाकाले यांनी बुधवारी केले आहे.