वाशिम: जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादीवर 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन
Washim, Washim | Oct 8, 2025 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग (गट) तसेच पंचायत समिती निर्वाचक गण निहाय मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून, प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सुचना 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत दाखल करता येणार असून, नागरिकांनी आपली हरकत किंवा सूचना संबंधित तहसीलदारांकडे दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दि. 08 ऑक्टोबर रोजी केले आहे.