दिग्रस: शहरात कचऱ्याचे साम्राज्य; ठेकेदार व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
दिग्रस शहरात कचरा संकलन ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आज दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेमार्फत कोट्यवधींचा ठेका देऊन शहरातील प्रत्येक घर व दुकानातून कचरा संकलन करून तो डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचवण्याची जवाबदारी ठेकेदाराकडे सोपविण्यात आली होती. त्यासाठी नगर परिषदेकडून कचरा गाड्याही पुरविण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कचरा गाड्या अनेक गल्ली, मोहल्ल्यात नियमित न फिरल्याने नागरिक त्रस्त झाले.