दहिवडी, ता. माण येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मायणी चौकातील ओमी मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, दुकानात ठेवलेले एकाही मोबाईल हॅन्डसेटला चोरट्यांनी हात लावलेला नाही. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर असलेल्या या शॉपीचे शटर उचकटलेले शुक्रवारी सकाळी दुकानमालकाच्या निदर्शनास आले.