राहुरी: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने भाजपावर आघात :मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस
आमदार शिवाजीराव कर्डिले हे ग्रामीण भागाशी जोडलेले व्यक्तीमत्व होत. असा जनतेशी नाळ असणारा जनतेचा माणुस आज हरपल्याने भाजपा परिवारासह मतदार संघात एक प्रकारे आघात झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज शुक्रवारी शिर्डी विमानतळावर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आमदार कर्डिले यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत श्रद्धांजली दिली आहे.