शेवगाव: शेवगावात गैरव्यवहारांचे सत्र ! कॉर्नेशन हॉल फंड कमिटी व भारदे साक्षरता प्रसारक मंडळावर गंभीर आरोप..
शेवगाव शहरातील कॉर्नेशन हॉल फंड कमिटी व भारदे साक्षरता प्रसारक मंडळ यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर गैरव्यवहार आणी आर्थिक अफरातफरीचे आरोप झाले असून दोन्ही संस्थांच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या संस्थेच्या काही पदाधिका-यांनी विश्वासघात, फसवाफसवी आणि खोटया सहया यांसारख्या कारवायांद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे.