खालापूर: खोपोली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल
आज सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खोपोली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, तसेच भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी एकदिलाने भक्कम पाठिंबा व्यक्त केला. खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कुलदीपक शेंडे यांच्या नेतृत्वाला जनतेकडून निश्चितच सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करतो.