चिखली: मुसळधार पावसामुळे कासारखेड,पेण टाकळी,गजरखेड, शेती शिवारात ऊस पिकाची मोठी हानी, शेतकऱ्यांचे नुकसान
मेहकर तालुक्यात सतत पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. विशेषतः जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिके आणि फळबागा पूर्णत उद्ध्वस्त झाल्या. दि 27/9/25 रोजी सायंकाळी मुसळधार पाऊस वार्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.कासारखेड 20हेक्टर पेनटाकळी 15 हेक्टर गजरखेड 5 हेक्टर अतिवृष्टीमुळे उसाची उभी पिके आडवी पडून गेली आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले .